Vinayak Damodar Savarkar information in Marathi language सावरकर हे एक भारतीय सैनिक राजकारणी, समाजसुधारक मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ होते. सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. सावरकरांनी विचार प्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केलेले आहे. सावरकर हे एक क्रांतिकारक होते. त्यांच्या नावावर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर या नावाने पुरस्कारही दिले जातात. त्यांच्याविषयी आपण माहिती पाहूया.
जन्म
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या शहरात 28 मे 1883 रोजी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकर यांना तीन अपत्ये होते. त्यापैकी दुसरे अपत्य विनायक होते. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकडे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारल्यामुळे थोरल्या भावाच्या पत्नी म्हणजेच येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील सुद्धा 1899 च्या प्लेगला बळी पडले.
बालपण व शिक्षण
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर सावरकर हे आपल्या भाऊ बहिणीच्या सहवासात राहू लागले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. म्हणून सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. वकृत्व, वाक्यरचना यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत असत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंनी फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन…. अशी शपथ घेतली.
तसेच मार्च 1901 मध्ये विनायकराव यांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला. लग्नानंतर 1902 साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व 1906 साली उच्च शिक्षणासाठी लंडन येथे गेले.
संघटना
सावरकर यांनी ‘राष्ट्रभक्तसमूह’ ही गुप्त संघटना पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने उभी केली. ‘मित्रमेळा’ ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे ‘अभिनव भारत’ ह्या संघटनेत रूपांतर झाले. त्यानंतर 1905 मध्ये सावरकरांनी पुण्याच्या विदेशी कपड्यांची होळी केली. श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली. होती. लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये राहत असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान केले होते त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुदत होती लंडनमध्ये इंडिया हाऊस मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले . मदनलाल धिंग्रा. हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य होता मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकार्याचा वध करून हसत-हसत फाशी स्वीकारली त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉंब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व बावीस ब्राऊनिंग पिस्तुले यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून अनंत कान्हेरे या 16 वर्षांच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या तीन सदस्यांना फाशी झाली कलेक्टर जॅक्सन जनतेवरील अन्याय वाढत होते. तसेच तो बाबाराव सावरकर यांच्या तुरुंगाला कारणीभूत ठरला होता म्हणून क्रांतीकारकांनी जॅक्शनचा खून केला.
इतिहास
1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 1857 ‘स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ आहे. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय. हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले होते. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोह कोपर लिखाण प्रसिद्ध केल्याचे आरोप ठेवून सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटीश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्यापाण्यावर धाडले. या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा यांनी गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन याच्या हातून घडली होती.
ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली. ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला पण किनार्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांनी दोन जन्मठेपेची काळ्यापाण्याची शिक्षा पन्नास वर्ष अंदमान यांच्या तुरूंगात ठेवण्यात आले. इंग्रज सरकारने त्यांच्यावर हरेकप्रकारे छळ केला.
या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते. मातृभूचे स्वातंत्र्य त्यानंतर 11 वर्षे हा छळ सहन करीत असताना, सावरकरांनी सर्जनशील कवित्व बंडखोर क्रांतीकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली. विठ्ठलभाई पटेल रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून 6 जानेवारी 1924 रोजी सुटका झाली.
हिंदू महासभेचे कार्य
सावरकर हे तेरा वर्ष रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत होते. सात वर्ष हिंदुमहासभेचे अध्यक्ष पद त्यानी भूषविले. झांजवत दौरे, मोठ्यामोठ्या सभा हिंदूंची सैन्यभरती रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन कॉंग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा सैनिकांची संख्या वाढवणे शस्त्रसज्जता अश अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला होता. साठ वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व स्वराज्यासाठी अथक परिश्रम घेतले होते.
ग्रंथ आणि पुस्तके
सावरकरांनी दहा हजार पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत, 15,000 जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिलेली आहे. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल, त्यांच्या “सागरा प्राण तळमळला” हे हिंदु नृसिंहा, प्रभो शिवाजी राजा, जयोस्तुते, तानाजीचा पोवाडा ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. सागरा प्राण तळमळला या कवितेला 2009 साली शंभर वर्ष पूर्ण झालेली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार
सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात. निनाद तर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राष्ट्रीय पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार. वीर सावरकर फाउंडेशनचा वीर सावरकर पुरस्कार दिला जातो. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरकर अभ्यास मंडळाचे वीर सावरकर सेवा पुरस्कार देण्यात येतो.
मृत्यूपत्र
सावरकरांनी मृत्युपत्र सादर केले होते. ते म्हणजे असे की, माझे प्रेत शक्यतो विद्युत चितेवर जाळण्यात यावे. त्यावेळी जुन्या पद्धतीप्रमाणे ते माणसांनी खांद्यावरून येऊ नये किंवा कोणत्याही प्राण्यांच्या गाडीमधून येऊ नये. तर यांत्रिक शववाहिका यातूनच विद्युत स्मशानात नेले जावे. माझ्या मृत्यू निमित्त कोणीही आपले दुकान किंवा व्यवसाय बंद ठेवू नये.
कारण त्याने समाजाला खूप त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा निर्माण होतो. म्हणून माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ किंवा ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो. अशा पिंडदान यासारख्या कोणत्याही जुन्या रुढी पाळू नये. त्या पिंडाला काकस्पर्श होई तोपर्यत वाट पाहत बसणे ह्या काही गोष्टी पाहू नये.
मृत्यु
1966 मध्ये वयाच्या 83 वर्षी त्यांनी प्रायोपवेशन याचा निर्णय घेतला. 1 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांनी अन्नपाणी आणि औषधांचा त्याग केला. अन्नत्याग केल्यानंतर 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे प्राण हे पंचतत्त्वात विलीन झाले. Vinayak Damodar Savarkar information in Marathi language. विनायक दामोदर सावरकर माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या historical touch या ब्लॉगला अवश्य भेट द्या.