Vinoba Bhave information in Marathi language | विनोबा भावे

Vinoba Bhave information in Marathi language विनोबा भावे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी यांच्या सोबत होते. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल 1932 मध्ये त्यांना तुरुंगवास घडला होता.

Vinoba Bhave information in Marathi language | विनोबा भावे

महात्मा गांधीजींच्या आध्यात्मिक परंपरेचे ते एक श्रेष्ठ वारस होते. त्यांचे हे प्रायोपवेशनाचे तंत्र हिंदू धर्म, बौद्ध व जैन धर्म या तिन्ही धर्मांना प्राचीन काळापासून मान्य असलेले तंत्र आहे. त्यांनी ‘गीताई’ ची रचना केली. तर चला मग पाहूया त्यांच्या विषयी माहिती.

जन्म

विनोबा भावे यांचे पूर्ण नाव आचार्य विनोबा भावे, म्हणजेच विनायक नरहरी भावे असे होते. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 ला झाला. त्यांचा जन्म कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी झाला. त्यांच्या आजोबांचे नाव शंभूराव भावे हे होते. त्यांचे टोपण नाव विनोबा आहे. त्यांच्या वडिलांचे नाव नरहर शंभूराव भावे आहे. तर त्यांच्या आईचे नाव रखुमाबाई आहे. ते एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह पूगारला. त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांची निवड केली जाते.

सुरुवातीचे जीवन

विनोबा भावे यांचे आजोबा शंभूराव हे वाई गावांमध्ये राहत असत या गावचे रहिवासी होते. त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाई गावात ब्राह्मणांच्या या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे. हे भावे यांच्या मालकीचे असून तिथे शंभूराजांनी अग्निहोत्र स्वीकारून अग्निहोत्र शाळा स्थापली होती. आजोबा आणि मातोश्री पासून धर्मपरायण त्याचे संस्कार विनोबांना मिळालेले होते. त्यांचे वडील नरहरी शंभूराव भावे आणि आई रखमाबाई. त्यांचे वडील नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले.

शिक्षण

विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. 1916 साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईत जाण्यास निघाले. परंतु वाटेतच सुरतेस उतरून आई-वडिलांना न कळवताच वाराणसी येथे गेले. त्यांना दोन गोष्टीचे आकर्षण होते. एक म्हणजे हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक वाराणसी येथील हिंदू विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीजींचे भाषण झाले. त्या भाषणाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला.

हिमालयातील अध्यात्म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधींच्या आणि व्यक्तिमत्व त्यांना आढळले आहे. त्यांनी महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला व गांधीजींची कोचरब येथे आश्रमात 7 जून 1916 रोजी भेट घेतली. तेथेच त्या सत्याग्रह आश्रमात ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवन साधना सुरू केले. ऑक्टोबर 2016 मध्ये महात्मा गांधीजी एक वर्षाची रजा घेऊन तेव्हा इथे प्राज्ञ पाठशाळेत वेदान्ताचे अध्ययन न करता उपस्थित झाले. विद्येची साधना त्यांचा जीवन उद्देश होता.

विनोबा भावे यांचे कार्य

गांधीजींचे मोठे भक्त शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधीनी विनोबांची रवानगी वर्ध्याला केली. 8 एप्रिल 1921 रोजी विनोबा पोहोचले. आतापर्यंत संबंध आयुष्य 1951 ते 1973 पर्यंतची भूदान यात्रा सोडल्यास या वर्ध्याच्या आश्रमात राहून विनोबांनी तपश्चर्या करीत जीवन घालविले. हा वर्ध्याचा आश्रम क्रमाने मगनवाडी बजाज वाडी महिला आश्रम सेवाग्राम व पवनार या ठिकाणी फिरत राहिला. ही सर्व ठिकाणे वर्ध्याच्या आठ किमी परिसरात आहे. दिवसातले सात-आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतीकाम यामध्ये यांनी घालवले.

माणसाने दररोज शरीरश्रम करायलाच पाहिजे, हे त्यांचा सिद्धांत आहे. शरीरश्रम आणि निष्ठा हे त्यांचे जीवन तत्त्वज्ञानाप्रमाणे महत्त्वाचे व्रत आहे. श्रमाबरोबरच त्यांनी मानसिक अध्यात्मिक साधनाही प्रखरतेने केली.

सन 1930-1932 सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारागृह भोगला. 1940 साली महात्मा गांधींनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरु केले तेव्हा त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. जवाहरलाल नेहरू हे दुसरे निवडले. अध्यात्मिक साधनेला वाहून घेतलेले शत्रू, मित्रसमूह भावी तपस्वी मनुष्य सत्याग्रहाला अत्यंत आवश्यक म्हणून त्यांनी विनोबांची निवड केली.

1932 सालचे सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनात विनोबांनी भाग घेतला. त्यांनी धुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगली. सुप्रसिद्ध गीता प्रवचने या कारागृहात त्यांनी दिलेले शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्हा स्तर शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारी या सभेत उपस्थित असतात. त्यांमध्ये शेठ जमनालाल बजाज, गुलजारी लाल नंदा, अण्णासाहेब दस्ताने, सानेगुरुजी इत्यादी मंडळी उपस्थित असत.

पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना भेटण्याकरता विनोबा दिल्लीला पायी चालत गेले. पुढे उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, ओरिसा, आंध्रप्रदेश, तामिळनाडु, कर्नाटक, महाराष्ट्र अश्या अनेक राज्यांमधे 1951 ते 1964 अश्या 14 वर्षांमधे विनोबा भावेंनी ग्रामदानाच्या आंदोलनासाठी भारतभर पदयात्रा केली.

आपल्या वयाच्या 55 वर्षांपासुन ते 68 वर्षांपर्यंत 40 हजार मैल पायी चालत देशातील या महत्वाच्या प्रश्नाला लोकांपर्यंत पोहोचवुन सोडवण्याचा प्रयत्न केला. ग्रामदान, संपत्तीदान अशी आंदोलनं चालवली आणि एकीकडे कंचनमुक्ती, ऋषीशेती सारखे शेतीविषयी प्रयोग देखील केलेत.

सन 1975 ला जेव्हां देशात आणीबाणी घोषीत करण्यात आली, तेव्हां त्या घटनेला विनोबांनी ‘अनुशासन पर्व’ म्हणुन समर्थन दिले. यावेळी त्यांची ही भुमिका वादग्रस्त ठरली. भुदान चळवळीची संकल्पना आणि त्याला मिळणारे यश ही बाब ऐतिहासीक ठरली. कायम सर्वोदयाचा विचार ठेवणाऱ्या विनोबांनी त्यांच्या ‘मधुकर’ या पत्रिकेत या विषयावर आपले विचार मांडलेत. बायबल आणि कुराण वर भाष्य करणारा त्यांचा ग्रंथ देखील विव्दत्तापुर्ण समजला जातो.

मृत्यू

दिनांक 15 नोव्हेंबर 1982 रोजी सकाळी 9.40 वाजता पवनार येथे परमधाम आश्रमाचे सतत सात दिवस प्रयोपेशन करून भूदान नेते आचार्य विनोबा भावे यांच्या वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले.

आचार्यांच्या निधनाची वार्ता भारतभर व जगभर सर्व प्रचारमाध्यमांतून वेगाने पसरली. या निधनाला कोणी महानिर्वाण म्‍हणाले, कोणी युगपुरुषाची समाधी म्‍हणाले. महात्‍मा गांधींच्या आध्यात्मिक परंपरेचे ते एक श्रेष्ठ वारस होते. त्यांचे हे प्रायोपवेशनाचे तंत्र हिंदू धर्म, बौद्ध व विशेषतः जैन धर्म या तिन्ही धर्मांना प्राचीन कालापासून मान्य असलेले तंत्र आहे.

जैन धर्मात या तंत्रास ‘सल्लेखना’ अशी संस्कृत संज्ञा आणि ‘संथारा’ ही प्राकृत संज्ञा आहे. हिंदु धर्मात यास ‘प्रायोपवेशन’ म्हणतात. प्राय म्हणजे तप. तपाचा एक मुख्य अर्थ ‘ अनशन ‘ असा आहे. देहाचे दुर्घर व्याधी बरे होऊ शकत नाहीत, असे निश्चित झाल्यावर रूग्णाला जलप्रवेशाने, अग्‍निप्रवेशाने, भृगुपतनाने अन्नपाणी वर्ज्य करून किंवा अन्य कोणत्याही इष्ट मार्गाने देहविसर्जन करण्याची हिंदुधर्मशास्त्राने अनुमती दिली आहे.

ज्ञानदेवादी संतांनी योगमार्गाने देहत्याग केला आहे. हा योगमार्ग गुरूगम्यच आहे. त्याचे वर्णन गीतेच्या आठव्या अध्यायात केले आहे. तात्पर्य, प्रायोपवेशन किंवा योगशास्त्रातील देहत्यागाची युक्ती हिंदुधर्मशास्त्राने मान्य केली आहे. विनोबांनी प्रायोपवेशनाच्या द्वारे देहत्याग केला. अनेक जैन साधू आणि साध्वी स्त्रिया आजही प्रतिवर्षी अशा प्रकारे देहत्याग करीत असतात आणि त्याची वार्ता वृत्तपत्रांतही केव्हा केव्हा येते. स्वातंत्र्यवीर सावरकर, धर्मानंद कोसंबी यांनी अशाच प्रकारे देहत्याग केला आहे.

विनोबांचे विचार

विनोबा भावे यांनी त्यांच्या विचारातून काही शब्द व्यक्त केलेले आहेत ते पुढील प्रमाणे.

वर्तमानाला बंधन असावे म्हणजे वृत्ति मोकळी राहते. सत्य, संयम व सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे. आध्यात्मिक व्यवहार म्हणजे स्वाभाविक व्यवहार म्हणजे शुद्ध व्यवहार. हिंदुधर्माचे स्वरूप : आचार-सहिष्णुता, विचारस्वातंत्र्य, नीति- धर्माविषयी दृढता.
प्राप्तांची सेवा, संतांची सेवा, द्वेष कर्त्याची सेवा ही सर्वोत्तम सेवा. असत्यात शक्ति नाही. आपल्या अस्तित्वासाठी हि त्याला सत्याचा आश्रय घेणे भाग आहे. सत्य, संयम, सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे. ईश्वर, गुरु ,आत्मा, धर्म, आणि संत ही पाच पूजास्थाने आहे. इतिहास म्हणजे अनदिकालापासून आत्तापर्यंत चे सर्व जीवन. पुराण म्हणजे अनदिकालापासून आत्तापर्यंत टिकलेला अनुभवाचा अमर अंश आहे. हे त्यांचे विचार अत्यंत मोलाचे व महत्त्वाचे आपल्याला दिसून येतात.

Vinoba Bhave information in Marathi language. विनोबा भावे ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.आमच्या आई मराठी Aai Marathi आणि अद्भुत मराठी Adbhut Marathi या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

Leave a Comment